पुणे – थुंकीबहाद्दरांनो आणि शहर अस्वच्छ करणाऱ्यांनो सावधान! महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तुमच्यावर नजर राहणार असून, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई होणार हे निश्चित झाले आहे. महापालिकेने 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 397 थुंकीबहाद्दरांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 44 हजार 50 रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरूच राहणार आहे.
No comments:
Post a Comment