पुणे – महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिले दिड वर्षे स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराज असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुख्यमंत्री फडणवीस पुण्यासाठी वेळ काढत असले तरी, त्यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या महापालिकेच्या कर्वे रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत होणार आहे.
No comments:
Post a Comment