पुणे – महापालिकेकडून शहरासाठी केल्या जाणाऱ्या साहित्य खरेदीची प्रक्रिया आता आणखीन पारदर्शक होणार आहे. महापालिकेकडून कोणतेही साहित्य खरेदी केल्यानंतर कोणत्या विभागाने किती साहित्य खरेदी केले, किती पालिकेस मिळाले, त्यातील किती साहित्याचा वापर झाला, किती शिल्लक आहे याची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी “मटेरिअल मॅनेजमेंट’ अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्यवर्ती भांडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment