Saturday, November 17, 2018

‘सौर ऊर्जा’ प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा निर्णय

पुणे : महापालिकेची विजेची गरज पूर्णपणे सौर ऊर्जेतून भागविण्यासाठी स्वतःचा ‘सौर ऊर्जा’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेची दैनंदिन विजेची गरज 90 मेगावॉट आहे. ही विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 20 हेक्टर जागेची मागणी पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. त्याशिवाय महापालिकांच्या इमारतींवरही सौरप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात त्यातून दरमहा 26 हजार 460 युनीट विजेची निर्मिती केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment