Tuesday, November 13, 2018

महापालिकेची स्वस्त आरोग्य सेवा ठरतेय जीवदायीनी

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा चांगलीच महागली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांसह त्यांच्या कुटुंबींयानाही बसत आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्याधुनिक अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या माध्यमातून अवघ्या तीन महिन्यांत महापालिका प्रशासनाने सर्वसामान्य रुग्णांना तब्बल चार हजार रुग्णांचा एमआरआय केला असून आठशे रुग्णांची सोनोग्राफी केली आहे, ही सुविधा अल्पदरात उपलब्ध होत असल्याने त्याला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारची सुविधा पुरविणारी पुणे ही राज्यातील पहिलीच महापालिका होय.

No comments:

Post a Comment