पुणे : आगाखान पॅलेससमोर मेट्रोच्या बांधकामाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’कडून (महामेट्रो) अद्याप पर्यायी मार्गांची चाचपणी सुरू आहे. पर्यायी मार्गांवरील अपेक्षित प्रवासीसंख्या आणि त्यामुळे वाढणारा खर्च, याचा ताळमेळ घालण्याचे काम सध्या सुरू असून येत्या काही दिवसांत त्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे संकेत ‘महामेट्रो’ने दिले.
No comments:
Post a Comment