Thursday, November 29, 2018

जुन्या रस्त्यावर डांबराचा मुलामा देवून महापालिकेची फसवणुक

पिंपरी चिंचवड : चिंचवड, आनंदनगर येथे एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सदर डांबरीकरण झाल्यानंतर सर्व रस्त्यांना मोठ मोठे खड्डे पडले आहेत. संबंधीत ठेकेदाराने प्रचलीत नियमानुसार शेड्युल बी नुसार काम न करता जुन्या रस्त्याला फक्त डांबराचा रंग, मुलामा मारला असून महापालिका आणि नागरिकांची फसवणुक केली आहे. यासंदर्भात रस्त्याच्या कामाचे ऑडीट होवून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी ज्ञानेश्‍वर सिद्राम इटकल,( रा. आनंदनगर, चिंचवड स्टे. पुणे, 19) यांनी केली आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता (पिं.चिं.मनपा.), कार्यकारी अभियंता, (पिं.चिं.मनपा.) यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment