Thursday, November 29, 2018

वृक्षप्राधिकरण समितीच वृक्षतोडीस जबाबदार

शहरातील वृक्षांच्या संवर्धनासाठी स्थापन केलेली वृक्षप्राधिकरण समिती वृक्ष संवर्धनापेक्षा वृक्षतोडीचे विषय अधिक मंजूर करत आहेत. वृक्षतोडीबाबत आलेल्या शिफारशींची प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी न करताच वृक्ष अधिकारी वृक्षतोडीला परवानगी देत आहेत; त्यामुळे  शहरातील वृक्षतोडीला खतपाणी मिळत आहे. या चुकीच्या पद्धतीने दिल्या जाणार्‍या परवानगीमुळेच अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वृक्षतोडीस वृक्षप्राधिकरण समितीच जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

No comments:

Post a Comment