Friday, November 16, 2018

बँकेतील ठेवींवर आता महापालिका होणार मालामाल

पुणे : बँकेतील ठेवींवर महापालिकेस मिळणार्‍या व्याजात आता घसघशीत वाढ होणार आहे. राज्य शासनाच्या 2015च्या आदेशानुसार 4 हजार कोटींपेक्षा अधिक मालमत्ता (नेटवर्थ) असलेल्या बँकांमध्ये ठेवी ठेवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिकेस बँकांमध्ये ठेवल्या जाणार्‍या ठेवींच्या व्याजात 40 ते 50 कोटींची घसघशीत वाढ होणार आहे. महापालिकेच्या सध्या वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 1600 कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यावर वर्षाला जवळपास 100 कोटींचे व्याज मिळते.

No comments:

Post a Comment