एमपीसी न्यूज – शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पुणे महापालिकेने नव्याने नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्ये तसेच समाविष्ट होणाऱ्या प्रस्तावित गावांमध्येही ‘टीपी स्कीम’ राबविण्याची योजना आहे. बांधकाम विभागाने पालिका आयुक्त सौरभ राव यांना या बाबतची सविस्तर माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून नुकतीच दिली.
No comments:
Post a Comment