एकिकडे पुण्यातील बांधकाम व्यवसायाला घरघर लागली असल्याचे चित्र असतानाच माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला मात्र चांगलीच बुस्ट मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत आयटीसाठी तब्बल दीड कोटी चौरस फुटांच्या बांधकामास महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात आयटी क्षेत्रातून लाखो नोकर्या उपलब्ध होऊन सर्व क्षेत्रातील व्यवसायांना चालना मिळू शकणार आहे.
No comments:
Post a Comment