Thursday, November 29, 2018

पालिकेकडून भुयारी मार्गासाठी 5 कोटी 84 लाखांचा धनादेश

हडपसर : ससाणेनगर, सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी सततची वाहतूककोंडी त्रासदायक बनली आहे. या पार्श्‍वभूमीर भुयारी मार्गासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून पुणे महापालिकेच्या वतीने पाच कोटी 84 लाखांचा निधीचा धनादेश रेल्वे अधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. त्यामुळे येथील वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्‍न मार्गी लागणार आहे. आगामी चार ते सहा महिन्यांत भुयारी मार्ग तयार होईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, पर्यायी भुयारी मार्ग करण्याचा मानस आमदार टिळेकर यांनी बोलून दाखविला होता. नगरसेवकांनी सह्यांच्या पत्राचा फ्लेक्स लावला होता. भुयारी मार्गाचा प्रश्‍न आम्ही सोडविला आमदार श्रेय घेत असल्याचा आरोप केला होता.

No comments:

Post a Comment