पुणे : शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या वीस मार्गाचे सर्वेक्षण करून या मार्गावरील वाहतूक नियंत्रक दिव्यांचे (सिग्नल) सुसूत्रीकरण (सिंक्रोनायझेशन) करण्यात येईल, असे स्मार्ट सिटी आणि वाहतूक पोलिसांकडून जाहीर करण्यात आले असले तरी सुसूत्रीकरणाच्या मार्गात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावरील सिग्नलची अपुरी संख्या, प्रत्येक सिग्नलच्या वेगवेगळ्या वेळा, मार्गावरील वाहतुकीनुसार सिग्नलच्या कमी-अधिक कराव्या लागणार्या वेळा आणि सिग्नल पुरविणार्या भिन्न कंपन्या यामुळे वीस मार्गातील सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याच्या प्रकल्पाला अनेक मर्यादा येण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment