पुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला असून, कारवाईनंतर ते पुन्हा उभारणार नाहीत याची व्यवस्था करण्याकडे मात्र यंत्रणेने काणाडोळा केला आहे. दरम्यान, कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
No comments:
Post a Comment