पुणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी 6 हजार 264 सदनिका बांधण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील शहरांत पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. पुण्यातही या योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे, कर्ज-संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणे आदी पद्धतीने सदनिका बांधता येणार आहेत.
No comments:
Post a Comment