बसने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीएलच्या वतीने महिन्यातून एकदा बसमधून मोफत प्रवास सवलत योजनेचे नियोजन केले आहे. मात्र, या योजनेमुळे वर्षांतील 12 दिवसांसाठी तब्बल 14 कोटी रुपयांपैकी 60:40 टक्के हिश्श्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आर्थिक भार पडणार असल्याने स्थायी समितीने या योजनेला स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी, ही योजना सुरू होण्याची शक्यता मावळली आहे.
No comments:
Post a Comment