पुणे : रस्त्यावर थुंकाल तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंड ही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान,गुटखा, तंबाखु घाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठपेक्षा अधिक जणांवर महापालिकेने कारवाई केली आहे.
महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयातंर्गत गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. बिबवेवाडी, टिळक रस्ता, औंध, विश्रांतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक हे देखील सहभागी झाले आहेत.
No comments:
Post a Comment