Saturday, November 3, 2018

पालिका उभारणार पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

पुणे : महापालिकेसाठी लागणारी विजेची गरज 100 टक्के सौरऊर्जेतून पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतःचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेचा दैनंदिन विजेचा भार 90 मेगावॅट असून ही विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार असून या प्रकल्पासाठी 20 हेक्टर जागेची मागणी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment