Friday, November 2, 2018

वारसा स्थळांमध्ये २५१ ठिकाणांची नावे

पुणे महानगरपालिकेच्या वारसा स्थळांच्या यादीमध्ये (हेरिटेज लिस्ट) तीन श्रेणीत २५१ ठिकाणांचा समावेश करण्यात आला असून, त्यात मंदिरे आणि शैक्षणिक संस्थांचा भरणा सर्वाधिक आहे. 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील शाळा, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठे अशा सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे. ही सविस्तर यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना महिन्याभरात त्यावर हरकती-सूचना नोंदविता येतील; तसेच त्यामध्ये आणखी काही वास्तूंची नावे सुचविता येणार आहेत.

No comments:

Post a Comment