पौडरस्ता (पुणे) : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या कामासाठीचे भूसंपादन 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले होते. त्याची टाईमलाईन संपूण गेल्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणून आम्हाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. डाव्या भुसारीतील व्यंकेटेश्वरा हाईटस या इमारतीमधील एका घराचा काही भाग महापालिकेच्या कर्मचाऱ्य़ांनी तोडला. सरकारने जाहीर केलेली भरपाई रक्कम मान्य नसल्याने अनेक जणांचा या संपादनाला विरोध आहे.
No comments:
Post a Comment