पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाहनचालकांकडून हुज्जत घालण्यापासून मारहाण करण्यापर्यंतच्या प्रकारात वाढ होत आहे. दर दिवशी पोलिसांबरोबरील वादाच्या घटना शहरात घडत आहेत. परंतु आता अरेरावी करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment