पुणे : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र पहारा देणार्या लष्करी जवानांसाठी खास दिवाळीच्या फराळाची अनोखी भेट महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचार्यांनी पाठविली आहे. मराठा बटालियनच्या युनिट-18साठी भोर गावचे मराठा बटालियनमधील जवान तुषार शेटे यांच्या माध्यमातून बुधवारी हा फराळ पाठविण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी, उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे, नगरसेवक सचिन दोडके यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment